कविता - 🌷 " अबोल प्रेम "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
ह्रदयामध्ये कालवा-कालव, झाली तत्क्षणी...
प्रितीचा मृद्गंध-दरवळतच राहिला मनोमनी...
अबोल प्रेम इतकं बोलकं कसं होऊ शकतं,
न बोलता-सवरता, सारंकाही सांगून टाकतं...
अळवाच्या पाना-पानांवर मग डोलंत बसतं...
थंडीवा-याला न जुमानता, मस्तीत दंग होतं...
बघता-बघताच सावली बरोबर अदृश्य होतं...
लपंडाव खेळता-खेळता क्षणभर विसावतं...
चंद्राच्या शीतल, शांत सुखदायी प्रकाशात,
हळूच इशारा करत, टिपूर शुभ्र चांदणं होतं...
आयुष्यात प्रत्येक टप्प्या-टप्प्यावर अलगद,
हात हाती घेऊन मनसोक्त झोके घेत बसतं...
दिवस असो, रात्र असो, वा-असो स्वप्नरंजन...
माझ्या सवे अबोल प्रेम मात्र असतं, कायमचं ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply