कविता 🌷 ” अपेक्षाभंग “


कविता 🌷 " अपेक्षाभंग "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

मन ओढ घेतच राहतं, निसर्गाच्या कुशीत...
कोणी पायबंद घातला आहे आजमितीस ?
सुख पायदळी तुडवून का व्हायचं बंदिस्त ?

आजवरची डरकाळी फोडणारी ही वाघीण,
आजकाल अशी 'भीगी-बिल्ली' का होतेय् ?
कर्तव्य-योग्य-अयोग्य ही गल्लत का करतेय ?

प्रयत्नांती नशिब बदलतं, हे ऐकीवात नाही !
भार देवावर टाकून द्यायला तयार का नाही ?
अपेक्षा नसेल तर अपेक्षाभंग होणारच नाही !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!