कविता – 🌷 ” अनुभूती “


कविता - 🌷 " अनुभूती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

झिरमिर बरसती श्रावणधारा ...
मनी मोर करीतसे गोड-इशारा ...
उधळीत-सप्तरंग उभा पिसारा ...
न कळत येतसे, मधुर-शहारा ...

टिपूर मस्तसं चांदणं पडलंय ...
पोर्णिमेचा चंद्रमा लुभावतोय ...
मनमानस मुक्तपणे विहरतोय ...
आनंद दुथडी भरुनी वाहतोय ...

ह्रदयी लागला हा एकच छंद ...
रसपानात मन-भ्रमर तो  गुंग ...
स्वानंदे गुंजारव करीतसे धुंद ...
उंच उंच आभाळी उडे स्वछंद ...

न कळे, मज का लागे ती ओढ अनामिक ...
न कळे का खेचे हे वेडे मन, अधिकाधिक ...
वाटे ही अनुभूती- दिलखुलास-दिलखेचक…
एकमेव-अद्वितीय-जणू "अद्भुत मनमोहक"...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!