कविता -🌷 " अनुभवान्ती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ९ ऑगस्ट २०२४
वेळ - दुपारी, १ वाजून २१ मि.
पूर्वीच्या-पिढीच्या काळात सुखाच्या शोधात
वणवण भटकंती करुन जात नसत परदेशात
जे कोणी जायचे, ते फक्त उच्च शिक्षणासाठी
देश-घरदार सोडून,स्थायिक होण्यासाठी नाही
आजकाल जो उठतो, जाण्यासाठी धडपडतो
साम-दाम-भेद-दंड वापरुन मग देशच सोडतो
एकदा का परदेशी गेला की तो तिकडचा होतो
तिकडेच मिळेल ते काम पत्करून, पोट भरतो
सुरुवातीस आई-वडिलांना थोडे पैसे पाठवतो
घर-संसार थाटल्यावर पैसे पाठवणे बंद करतो़
नवीन नाती जोडली म्हणून कुणी जुनी तोडतो?
नवीन मोडीत निघाल्यावर, मनोमन पस्तावतो
"जुनें जाऊ दे मरणा लागूनी"या पंक्ती तो जगतो
"पाण्याहून रक्ताचे नाते घट्ट,"अनुभवांनी शिकतो
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply