कविता 🌷’ अनमोल बंध ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, १६ ऑगस्ट २०२३
वेळ : रात्री ९ वाजून ०५ मि.
आयुष्यात अशी एक वेळ नक्की येते
जेव्हा खरं ऐश्वर्य म्हणजे काय समजते
पैशांचं ‘मायाजाल’ किती फोल, कळते
नात्यांची किमया अनमोल हे जाणवते !
हृदयाशी घट्ट निगडित गोष्टीच बहुमोल,
उमगते की बाकीचं सगळंच माती-मोल
मालमत्ता-गाड्या-बंगले सर्व कवडीमोल
आपल्या माणसांच्या शिवाय सारं फोल !
ऊनपाऊस-अरिष्टांची झळ नको यांना
जीवापाड जपायलाच हवं याच बंधांना
खेचताण नको कोमल नाजुक पाशांना
असा अमूल्य ठेवा लाभतो भाग्यवंतांना !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply