कविता -🌷 ” अध्यात्मिक- विचारांचा चष्मा “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २५ नोव्हेंबर २०१६
जसा चष्मा लावू, तशीच दिसेल दुनिया
नजरेत असेल प्रेम, अंतरी दाटेल माया
भगभगित उन्हात, भासेल शितल छाया
क्षणन्-क्षण मोलाचा-न कधी जाई वाया
सर्वत्र जणू ” वैकुंठ ” वाटेल,
वाळवंटी सुद्धा स्वर्ग भासेल …
बर्फाच्छादित कैलाश, जणू भाळी दिसेल
निळाशार-शांत मानसरोवर स्वकंठी वसेल
विशाल मन दशदिशा विस्तारेल
ज्यात संपूर्ण विश्वंच सामावेल !
देशप्रेमाबरोबर, विश्वप्रेम बरसेल
दरेक कृतीतून भक्तिरस पाझरेल
सृष्टीतील प्रत्येक जीव-जंतू-पशू-पक्षी-प्राणी,
कोणत्याही रंगाचा वा आकाराचा, उपद्रवी-निरुपद्रवी असला-नसला
तरी कायम वाटेल “आपलेपणा”-एक-अदृश्य-समान-सूत्र “जिवंतपणा ” !
त्या प्रत्येकाच्या डोळ्यांत तीच चमक प्रकटते,
जी दरेक जीवंत-डोळ्याच्या बाहूलीतून दिसते
काऊ-चिऊ-माऊ अन्य जीव कैक
त्यांच्यातंलं ” देखणेपण “जाणवतं
त्यांना खूप काही समजतं- कळतं
मनुजा ते कळण्या, योजनं लागतात
अशा नाना नवं-जाणीवा होऊ लागतात
सूक्ष्म-पातळीवर”आत्मतत्व” दिसू शकतं
विराट-स्वरूपी-आत्मरूप समोर प्रकटतं !
निसर्गाचं नाविन्यपूर्ण रूप प्रकर्षानं साकारतं …
जर अध्यात्मिक- विचारांचा चष्मा लावलात …
अन,अभ्यासू-वृत्तीनं जगाकडे पाहू शकलात …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply