कविता – 🌷 “अद्वितीय, दिव्य रसायन “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – सोमवार, १५ मे २०१७
ती संमिश्र भाव-भावनांनी सजलेली …
दोन मे ची अद्भूत अशी पहाट उगवली …
एकीकडे,
भुर्रकन् उडून, अखेर पिल्लांकडे जाण्याचा
तो सुदिन, वास्तवात येऊन उभा ठाकलेला …
यामुळे प्रचंड आनंद, मनोमनी होता दाटला …
तर दुसरीकडे,
लग्न करून, शुभ-विवाहानंतरच्या अनंत …
अत्यंत नाजुक, हळुवार आठवणी व क्षण …
या सगळ्याला साक्षिदार असणार्या,
सुंदरशा या शुभ-शकुनी वास्तुला,
तिच्या हक्काच्या या “गृहलक्ष्मीला”…
आता मात्र बराच काळ मुकावं लागणार …
देहानं दूरदेशी पण मन इथेच रेंगाळणार …
‘घर’ म्हणून हीच वास्तु समोर साकारणार …
तिचा प्रिय सुंदर निसर्ग, निगडीत या वास्तुशी
फुल-झाडं, किचन-गार्डन जी तिने लावलेली …
या वास्तुतील काऊ-चिऊ पोपट-मैनादी पक्षी …
खूप हलकं वाटत होतं, जरुरी कामं पूर्ण झाली …
तिने मना-पासून, आवडीने, सुशोभित केलेली
प्रत्येक गोष्ट, कोनाकोपरा अन् खोली-न्-खोली
या सर्वांना पाहताना डोळे भरून …
तिचं हळवं मनही भरून आलेलं …
साश्रू डोळ्यांपुढे सगळं चित्रं धुसर झालेलं …
जुन्या वाँचमनला बोलावून घेऊन …
शेवटी मनाचा हिय्या करून,
सर्व कुंड्यातील झाडं, वेली छाटून …
तळ-मजल्यावर, सगळ्या सुखरूपपणे नेऊन ठेवल्या
काही-काही शेजारी-पाजारी यांच्यात वाटून टाकल्या …
गॅलरी खिडक्या ग्रिल्स सर्व-काही रिकामं-रिकामं …
सगळं काही साफ-सुथरं, एकदम रिक्त-आोकंबोकं
शून्य नजरेनं त्याकडे बघताना, उगीचच विनाकारण
एक हलका-किंचितसा-विषण्णतेचा स्वर डोकावला
तत्क्षणी आभास मनी अत्यंत अनमोल ठेवा हरवल्याचा
” मानवी-मन ” हे एक, असंच विलक्षण
अत्यंत महान, अद्वितीय, दिव्य रसायन
ज्याचा थांग लावणं, महा-कर्म-कठीण …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply