कविता :🌷’ अदृष्य-बंध ‘

कविता :🌷’ अदृष्य-बंध ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : १४ मे २०२३
वेळ : १० वाजून १८ मि.

आकाशाएव्हढा विशाल कागद
अन् सागर-जलाची केली शाई
तरी जन्मदात्या मातेची महती,
कधीही लिहून पूर्ण होणार नाही !

नऊ-मास उरी-पोटी सांभाळून,
सतत रात्रीचाही दिवस करून,
हातांचा झुलता पाळणा करून
इवल्या जीवाला ती ठेवते जपून !

नि:स्वार्थी प्रेमाची पखरण करून,
अवघं जीवन टाकते हर्षाने उजळून
निरपेक्ष भावे जीव टाकते ओवाळून
संकटाचे सावटही, ती देते घालवून !

मुलं वयानं कितीही मोठी झाली तरी
त्यांची काळजी आईच घेते सर्वतोपरी !
दोहोंमधील अदृष्य-बंध, अतूट-मजबूत 
नाळ कापली तरी कायम राहती शाबूत !
नाळ कापूनही कायमचेच राहती शाबूत !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
























Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!