कविता 🌷’ अज्ञानाचं ज्ञान ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, ३१ ऑगस्ट २०२३
वेळ : १२ वाजून ०३ मि.
” बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले “,
“अंगे झाडीन अंगण, त्याचे दास्यत्व करीन”
“जो बोलतो तसंच प्रत्यक्षात वागून दाखवितो,”
“अशा महान विभूतीचा सेवा-लाभ मी इच्छितो” !
संत तुकाराम महाराज अभंगवाणीतून, म्हणाले
मोजक्या शब्दांत त्यांनी किती अगाध ज्ञान दिले !
स्वतःहून शिकल्यावीण ज्ञान-दीप कसा उजळेल
स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग तरी कसा काय दिसेल ?
मुळात आपल्या ‘अज्ञानाचं ज्ञान’ जरुरी आहे होणं,
जगी सर्व-व्यापी, सर्व-ज्ञानी ईश्वराविना आहे कोण ?
सकारात्मक भावाने त्याला संपूर्णपणे शरण जाता,
आपल्याच-अज्ञानाचं ज्ञान-होऊन, हरते भव-चिंता !
अलिप्त-मनानं बाह्य-दुनियेचे मायावी-पाश तोडणं,
अध्यात्म म्हणजे ते आत वळवून स्वयं केन्द्रित करणं
अथांग महासागराच्या अक्राळ-विक्राळ स्वरुपातून,
‘स्वतः क्षुद्र-नगण्य-जीव’, कळतं तुटपुंज्या कुवतीतून
लांब-लांबपर्यंत हिमाच्छादित महा-काय पर्वत-रांगा,
‘रेती-कणाहून तुच्छ आपलं अस्तित्व’, फुकट हा त्रागा
शेकडो वर्षे जुने अति-प्रचंड घेरा असलेले वट-वृक्षादी,
स्पष्टच पटवून देती, आपल्यातील अनादी-अनंत त्रुटी !
त्यांचं आकलन होता, येतो खरा अध्यात्मिक-दृष्टीकोन
भास-आभासांची उकल होऊन प्रश्न पडतो “मी कोण”?
शास्त्रशुध्द-अध्यात्मिक-वाढ आधारित निर्विचार स्थिती,
डाव्या-उजव्या मेंदूचा समतोल साधून, होई तिची प्राप्ती !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply