कविता :🌷’ अक्षय-संपदा ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शनिवार, २३ एप्रिल २०२३
वेळ : संध्याकाळी ६ वाजून ५० मि.
आजच्या शुभ दिवसाचं अनन्यसाधारण असं महत्त्व
वैशाख मास शुद्ध तृतीया, तिथी आहे “अक्षय-अनंत”
अर्थात् कधीही नाश न पावणारी संपदा म्हणून अक्षय
पुराणानुसार या दिवशी त्रेतायुगाचा झाला होता प्रारंभ
नरनारायण-परशुराम-हयग्रीव त्रयीचा पवित्र जन्मदिन
साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्वपूर्ण शुभ-मुहूर्त,
सोन्यासारखा दिवस म्हणून सोनं खरेदीसाठी सुयोग्य
अक्षय-आयु-आरोग्य-शक्ति-समृध्दि-तृप्ती-शांंती-सुख !
शुभेच्छांची देवाण-घेवाण, पूर्वापार चालत आलेली प्रथा
अतिशय शूर-वीर-अद्वितीय योध्द्याची-परशुरामांची कथा
“जसं पेरु, तसंच उगवतं” या उक्तीची मग पटते यथार्थता
चोवीस विष्णु-अवतारांमधील दरेक अवताराची दिव्यता !
भगवान परशुराम म्हणजे श्रीविष्णुचा सहावा खास अवतार
ऋषी जमदग्नी-रेणुका यांचा आज्ञाधारी-सुपुत्र, तपस्वी फार
परम शिव-भक्त, शूर, आत्मनिर्भर चिरंजीवी विष्णु-अवतार !
एकवीस वेळा नि:क्षत्रिय भूमी, केला पूर्ण क्षत्रिय-वंश-संहार !
प्रजापति कश्यप-दनु पुत्र-हयग्रीव हा श्रीविष्णुचा एक अवतार
मानवी शरीर आणि घोड्याचं शिर असलेला हा विशेष अवतार
मधु-कैटभ नामक दैत्यांचा विनाश, वेद वाचविले-केला उद्धार !
हयग्रीव-मंत्र-पठणाने सिद्धि-शक्ति-उत्कृष्ट स्मृती यांना येते धार
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥”
“परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥”
भगवत् गीतेतील श्लोकानुसार ईश्वर अवतार घेऊन प्रकटतात
जेव्हा अधर्म-सज्जनांचा छळ-अन्यायादी करुन दुष्ट माजतात,
धर्म:पतन थांबवून जनांची रक्षा करण्यास श्रीविष्णु प्रकटतात
युगे-युगे जन्म घेऊन दुष्ट-दानव-दैत्यांचा समूळ विनाश करतात !
जसे ईश्वर अवतार घेतात, कलियुगात राक्षस रुपं धारण करतात,
लाच-लुचपत-अन्याय-शोषण-दारु-अफू-गांजादी रुपांनी येतात !
अधम वृत्तींचा समूळ नि:प्पात करुन शांति प्रस्थापित करण्यास,
भू वर-सुधर्म पुन:स्थापित करण्या, पुनःपुन्हा भगवंत अवतरतात !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply