कविता -🌷 ” अंतस्थ-शांती “

कविता -🌷 " अंतस्थ-शांती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

ब्रह्मतपामध्ये लीन होती त्रिभुवन-सुंदरी,
त्रिकालज्ञानी धरोनी, रुद्राक्ष-माळ करी ...
कमंडलू धारण केले, देवीने दुसऱ्या करी ...
श्वेत-वस्त्र-परिधानित हीच ती माहेश्वरी ...

गौर-वर्णावरती शोभती शुभ्रधवल-वस्त्रं ...
शांतीदायिनी-देवीचे, तपश्चर्या हे अस्त्रं ...
तप-साधनेत संपूर्णत: रत, न हाती शस्त्रं ...
ज्योतीर्मय अंतस्थ-तेज-पसरले चतुरस्त्रं ...

शोभे पुष्पालंकारांनी-देवी, ब्रह्मचारिणी ...
श्वेतांबरा-देवीस“अपर्णा”म्हणती कुणी ...
जे-भक्त-मनोभावे-पूजती, देवी-देई-तृप्ती
तिच्या दिव्य-दर्शने लाभे-अंतस्थ-शांती ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!