कविता -🌷 ” अंतर्-मनीचा हुंकार “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, २० मे २०१७
अंतरमनी उमटलेले हे भाव-तरंग …
सहजतेने प्रकट होता, शब्द-ब्रह्म …
साकार होतं एक तरल नाद-ब्रह्म …
सुशांत तनमन, निवांत आसमंत …
कोण हळूवार गातंय्, लयही संथ …
जणू उठतसे उन्मनी आनंद-तरंग …
निळं, निरभ्रं नभ, मोहवतं नयनास…
मोहक सुगंध, कुणी भरला सुमनात
मन झालं “सु-मन” हर्ष जाई गगनात …
मानसरोवरी-स्वच्छ आरस्पानी जळ
गोड पाण्याचं सर्वोच्च उंचीवरचं तळं
मनसोक्त दर्शनाने, प्रसन्न मन-कमळ
झुळू-झुळू पवन-नभी चांदणं टिपूर …
अद्भुत-दर्शन ते शुभ्र-कैलास-शिखर …
परिक्रमा करताना, उदात्त भाव सुंदर …
प्रणव-नाद जणू अंतर्-मनीचा हुंकार …
संथ लयीमध्ये जणू निनादतोय झंकार …
सप्त-स्वर-अनंत श्रुती-म्हणती ओंकार …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply