कविता – 🌷 ‘ अंतर्द्वन्द्व ‘

कविता - 🌷 ' अंतर्द्वन्द्व '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ११ जानेवारी २०२४

युगानु-युगे मनोभावे सर्वजण करती पारायणं ...
असा"अमोघ मंत्र"जो हमखास करी"तारंण"...

बायका-मुलाबाळांचे, कुटुंबाचे, भरण-पोषण ...
वर्षानुवर्षे वाटमारीच होते, उदरभरण-साधन ...

अंती भानावर येऊन, अखंड-राम-नाम घेता ...
तरुन गेला "वाल्या"सर्व पापांचे भस्म होता ...!

झाला नव्याने तेव्हा वाल्याचा-ऋषी-वाल्मिकी ...
ज्याने उत्स्फूर्तपणे रचली कथा-राम-जानकी ...

प्रेरीत झाला शेवटी, अंतस्थ अंतर्द्वन्द्व मिटता ...
धन्य-धन्य वाल्या, झाला "रामायण" रचैता ...!

महाऋषी वाल्मिकी रचित अमरकथा-रामायण ...
अमर झाले वाल्मिकी,अद्वितीय त्यांचे लिखाण ...
अजरामर त्यांची तपस्या-नामजप-साधना-महान ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!