कविता – 🌷 ” अंगारकीच्या निमित्ताने ” तारिख – गुरुवार, १६ फेब्रुवारी २०१७

कविता – 🌷 ” अंगारकीच्या निमित्ताने ”      
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 
तारिख – गुरुवार, १६ फेब्रुवारी २०१७

प्रत्येक संकष्टीला टिटवाळ्याच्या-गणपती-दर्शनाला न चुकता जाणारी 
तिच्याकडे २००९ सालापासून, स्वयं-पाकाचं निगुतीने काम करणारी,
तिच्या कुटुंबियांची  शारीरिक देखभाल व तब्बेतीची काळजी जपणारी 
परिस्थितीने गांजलेली तिची स्वयंपाकीण-अनिता नावाची तरुण स्त्री …
अनिता पहिल्यांदा तिला भेटून पगार-वेळ-आदी ठरवूनही,
तिला कामावर ठेवायला, तिचं मन होत नव्हतं राजी …
ती “हायजीनच्या” बाबतीत भयंकर कडक शिस्तीची …
तशात जेवण बनवण्यासारखी महत्वाची बाब होती …

तिला स्वयंपाक-कलेची आवड बेताचीच-अथ पासून इतिपर्यंत सगळं येत असलं,
तरी उत्साह टिकायचा एक दोन पदार्थां पर्यंत-असं असूनही नवीन मुलीला अचानक
अनिता येऊन, कामासाठी भेटूनही तिला स्वयंपाकाला ठेवायला, तिचं मन कचरत होतं …
शेवटी तिने स्पष्ट म्हटलं ,”काटेकोर स्वच्छता पाळावी लागेल “…
स्वच्छता-टापटीप पाळून स्वयंपाक करायला तुला जमेल ?
या सर्व गोष्टी अनिताने कबूल झाल्यावर हिची नियमावली निघाली …
सर्वच्या सर्व नखं कापलेली व स्वच्छ हवी-रोज स्वच्छ स्नान जरुरी 
हातपाय धुवून, केस घट्ट-बांधून, किचन-एप्रन घालून कामं सुरु करायची …
कपाटातून काढलेली भांडी-पातेली नळा-खाली धुवून,मगच वापरायची…
 स्वयंपाक करताना स्वतःच्या तोंडाला,नाकाला,अंगाला,हात लावायचा नाही …
लावल्यास, साबण-सॅनीटायझरनं, परत एकदा स्वच्छता जपायला हवी …
खोकला,शिंक येतेय असं वाटताच, धावत दुसऱ्या खोलीत धाव घ्यायची…

बनलेला पदार्थ, कॅसेरोलमध्ये ठेवायचा-फ्रीझला फक्त विचारुन हात लावायचा …
हे ऐकून अनिताचे डोळे व तोंड दोन्ही उघडेच्या उघडे अन् चेहरा पाहण्यासारखा …
पण तिला काम हातचं जाऊ द्यायचं नव्हतं, घरच्या परिस्थितीनंही नाडलेली होती,
“ताई, तुम्ही सांगितलेलं नीट लक्षात ठेवूनच मी काम करीन “असं तिला म्हणाली …
सर्व अटी मान्य झाल्यावरच, अनिताला स्वयंपाक करायला तिने मान्यता दिली …

सुरवातीस दोघींनाही बरंच जड गेलं …पण हळूहळू अनिता रुळली कामात,
आज नऊ वर्षे, ती ते काम करतेय …“तिचा” मूड खुपसा सांभाळून घेतेय
याचं तिला नक्की कौतुक आहेच-आता अनिता, जणू घराचा हिस्सा बनलीय …
“अनिता शिवाय आईचं पानही हलणार नाही-शंभर टक्के ही शक्यता आहे दाट” …
तिची मुलं चिडवतात ,”काढावं लागेल परदेशी आईच्या बरोबर अनिताचंही तिकीट” …
🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🌅



















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!