कविता : 🌷 सुखाची धरूया कास
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
संक्रांतीचा सण म्हणजे आनंदाला खुलं आमंत्रण...
सूर्यदेवही उत्साहात आरंभ करतो मकर संक्रमण...
संक्रांत म्हटल्यावर आठवते ती काळी-चंद्रावळी...
सुवासिनी-मुलीबाळी-सूना कोरती चंद्रकोर भाळी...
हलव्याच्या दागदागिन्यांनी नटून-थटून मिरवतात...
सारेच जण गुळ-पोळ्यांवर यथेच्छ ताव मारतात...
भारतभर वेगवेगळ्या नावांनी सण होतो साजरा...
हर्षोल्लासाला उधाण येऊन दु:खाचा होई निचरा...
उन्ह सरल्यावर संपूर्ण कुटुंबाचं वास्तव्य गच्चीवर...
खाणं-पिणं पतंग उडवणं मस्तीची मात सुस्तीवर...
हजारों-लाखों पतंग, रंगबेरंगी नेत्रदीपक आकाश...
किती चढ-उतार आले तरी सुखाची धरूया कास...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply