कविता :🌷’मांगल्याचं प्रतिक’

कविता :🌷’मांगल्याचं प्रतिक’ 
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, १७ जुलै २०२३
वेळ : ११ वाजून २४ मि.

कोणत्याही कार्याची-कार्यक्रमाची-सुरुवात,
सामान्यत: दीप-प्रज्वलन-करुनच करतात !

हिंदू-संस्कृतीनं दिव्याला विशेष दिलं महत्त्व,
दीपाच्या-माध्यमातून मांगल्य-समृद्धीचं-तत्व !

अग्नि-प्रती कृतज्ञ-भाव व्यक्त करण्यासाठी,
पुरणाचे दिवे व त्यात साजूक तुपातील वाती

नितांत सुंदर, शांत-पवित्र वातावरण-निर्मिती
मनोभावे-पूजन-अर्चनाने प्रसन्न होई चित्तवृत्ती 

मना-मनांत-अज्ञान-रुपी-अंध:काराची भीती, 
ज्ञान-दीप उजळून, दिव्य-प्रकाशाची प्रचिती !

श्रावणाच्या पवित्र आगमनाची आगामी वर्दी,
सोमवारची-दीप-अमावास्या होते “सोमवती”!

यथासांग ‘दीप-पूजनाचा-विधी’ करुन संपूर्ण,
पुरणाचे दिंड बनवून गोड-नैवेद्य होतो अर्पण !

सगळे जीभेचे चोचले श्रावण सुरु होण्याआधी, 
आषाढी-अमावास्येला खवय्ये यथेच्छ पुरविती !

आयुष्यात सुख-शांती-तृप्तीसाठी मूक-आवाहन,
सूर्यस्वरुप-अग्निरुप-तेजस्वी लक्ष्मीचं गृहागमन!

मानस-पूजा स्वीकार होऊन, इच्छा होवोत पूर्ण
दु:खाचा विलय होऊन-दरेक क्षण होवो सुवर्ण !

दिव्यांची पूजा केल्यामुळे महालक्ष्मी होई प्रसन्न
सुख-शांती-समाधान घरीदारी संपदा स्थानापन्न 

सर्वांवरती महालक्ष्मीची सदैव राहो अखंड-कृपा,
उजळू दे-ज्ञानरुपी-प्रकाश म्हणून दिव्यांची-पूजा !

जीवन-अंधारातून प्रकाश-पथावर नेणारा दिवा, 
‘मांगल्याचं प्रतिक’ म्हणून सदैव जपायला हवा !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



























Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!