कविता-🌷”क्षण-प्रितीचे-मंतरलेले”

कविता-🌷"क्षण-प्रितीचे-मंतरलेले"

कविता-🌷"क्षण-प्रितीचे-मंतरलेले"
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

मेघ नभीचा बरसला अन्
मातीला भिजवूनी गेला...
गंधीत होऊनी वसुंधरा,
स्वर्गसुखे आनंदली धरा...

तन-मन प्रसन्न होऊनी
ते कोकरा सम बागडले...
क्षणार्धात आठवांचे ओले,
मनीचे निर्झर झुळझुळले...

भेटीच्या तीव्र आसेने,
मनही पोखरूनी गेले...
क्षण-प्रितीचे मंतरलेले,
कुणी हळूच चोरूनी न्हेले ...

जणू कमळ फूल उमलले
भ्रमराच्या मनात ते भरले...
मिलनाची आस त्या खेचें,
कमळ-मिठीत भान हरपले...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!