कविता :🌷”कधी कधी”


कविता : 🌷 " कधी कधी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कधी कधी वेडं मन था-यावरच नसतं...
स्वैर होऊन अथांग सागरी डुंबत बसतं...

कधी कधी मन एकदमच होतं अलिप्त...
जणू काही अळवावरील दवबिंदूच तृप्त...

अगदी कशा-कशातही नाहीच गुरफटंत...
प्रयत्नांची शर्थ करूनही नाहीच अडकंत...

जणू आकाशात घिरट्याच घालत बसतं...
मध्येच उंच झाडावरती बसून न्याहाळतं...

त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून आयुष्य पाहतं...
सुख-दु:खाच्या पलीकडचं क्षितीज शोधतं...

"आजी-आजी" अशा लडिवाळ आवाजाने...
भानावर येतं, इवल्या हातांच्या गोड मिठीने...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!