कविता :🌷”उदंड माया”


कविता : 🌷 " उदंड माया "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

आदि-अनंत कालीन ज्ञानेश्वर अन् मुक्ताई...
प्रतिकूल परिस्थितीतही, माया-चिरस्थायी...

तसं पाहिलं तर, भाऊबीज हा एक दिवस…
संपूर्ण वर्षामध्ये, तो येणार फक्त एकदाच

परंतु प्रत्येक भावा-बहिणीच्या, अंतरंगात…
त्याची आठवण दरवळते कायम स्वरूपात

दोघे कितीही लांब असले वा अगदी जवळ…
प्रेमाचा झरा झुळझुळ वाहत राहील निर्मळ…

लहानपणीचे निरागस मनावरील संस्कार…
थेट आयुष्यभराची साथ करतच असतात…

जीवनभरात कित्येक नाती जोडली जातात…
अत्यंत निर्मळ पवित्र बंधही जुळत असतात…

बहिण भावाचं, विशेष असं हे एकमेव नातं…
त्यामध्ये कधीच काहीही अधिक-उणं नसतं…

भावा-बहिणीची उदंड अशी, निरामय माया…
जणू जिव्हाळ्याचा, मंद-मंद-सुगंधित फाया…

दोघे कितीही लांबवर असो वा अगदी जवळ…
प्रेमाचा झरा झुळझुळ वाहतच राहील निर्मळ

पितृतुल्य भावांचा भक्कम असा आधार-स्तंभ
जन्मो-जन्मीच्या पुण्यामुळे, पवित्र दैवी सम्बंध

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!