कविता :🌷”आहे तुझ्याच पाशी”
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, ३ एप्रिल २०२३
वेळ : दुपारी, १ वाजून ५७ मि.
सामान्यतः माणसाला संकट-समयी
आठवण होते त्या अत्युच्च शक्तीची !
मनोमन धावा सुरु होतो मदतीसाठी,
शरणागती ३३ कोटी देवी-देवतांची !
मग शोध सुरु होतो त्याच्या अस्तित्वाचा
कधी तो मूर्ती-स्वरूपात दिसतो कुणाला,
तर कधी अमूर्त-स्वरूपी भासतो कुणाला
शोध घेतो सृष्टीच्या विविध खाणाखुणांचा !
कुणाला दृष्य-स्वरुपात त्याची येते प्रचिती
तर कुणा-कुणाला अदृष्य शक्तीची अनुभूती !
कुणा वाटतो तो कुंभार, करतो किमया सारी
तर कुणाला वाटतो जादूगार, करतो जादूगरी !
कुणी शोधी त्याला जाऊन विविध तीर्थक्षेत्री
पालथी घालून सर्व देवालयं, रामेश्वर-काशी !
तर काही जण शोधती त्या वर उंच आकाशी!
अज्ञानी न जाणती, “तो आहे तुझ्याच पाशी” !
यात्रा-तीर्थाटनं जरुरी, रुचीपालट-गंमत म्हणून
शोधून मिळेल “तो”फक्त सजीव प्राणीमात्रांमधून
निराकार निर्गुण तो, प्रकट होतो चरा-चरामधून !
मिटल्या डोळी, मनास जाणवी “संवेदना” बनून !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply