कविता :🌷”आकलन”


कविता : 🌷 " आकलन "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

ब-याच वेळा एखाद-दुसरी साधीशी घटनाच घडते ...
तद्-नंतर मात्र ती खूप दूरवर खोल परिणाम करते ...
पण आपल्याला लगोलग काहीच आकलन न होते ...

ब-याच उशीराने, विचारान्ती हलकीशी जाणीव होते...
आयुष्य पाहिलं तर, निव्वळ अपघाती घटनाच आहे...
हा अपघातही विधात्याच्या योजनेचा एक भाग आहे...

हे लक्षात यायला बराचसा कालावधी लागतो मुळात...
पूर्व-नियोजित गोष्टी, कधीही "नियोजित" न भासतात...
सकृत-दर्शनी न वाटल्या तरी, पूर्व-नियोजितच असतात...

आपल्या समोर नेहमी तीन-ते-चार-पर्याय  असतात,
आपण सखोल विचार-मंथन करून मग त्यातलाच,
निवडतो कधीकधी एखादा मार्ग स्वयंस्फूर्त-रित्याच...

वास्तविक पाहता, आपण कधीही नसतोच " कर्ता "
नेहमीच " प्रि-प्रोग्रॅम्डं "असण्याची घनदाट शक्यता...
कदाचित असावा हा एक विडीओ-गेम-विधात्याचा...

त्यातील एखादी नगण्य व्यक्ती, ही आपली भूमिका
त्याच्या विरंगुळ्याचा एक-अब्जांश, क्षुल्लक हिस्सा
जरी " गेम " जिंकण्याचीच प्रत्येकात असते क्षमता...

पायाभूत कुवत अंगी असूनही, किती " श्वास टिकेल...
यशस्वी होऊन कोणत्या" पायरी-पर्यंत जाऊ शकेल ...
हे त्याच्या अंतर्गत-सूक्ष्म जाणीवांवर अवलंबून असेल ...

ज्याप्रमाणे बुद्धिबळाच्या खेळातील प्रत्येक प्याद्यात,
स्वतः "वजीर"होण्याची पात्रता असते सुप्त स्वरूपात,
बहुतांश प्यादी अयशस्वीच वजीर-पद प्राप्त करण्यात

अनेक गोष्टींवर अवलंबून त्याचं वजीर होणं-न-होणं...
त्याचप्रमाणे प्रत्येक माणसात सुप्त-शक्ति आणि-गुण...
जे अत्यावश्यक असतात दैवत्वा-पर्यंत-पोहोचण्यास

पण माणसाला जन्मजात भोवणारे "शड्-रिपू" नडतात
त्याचं चित्त विचलित करून त्यास एक-प्यादं बनवतात
आयुष्यभर एकेक घर, पुढे-मागे करणेच भाग पाडतात

अन् कार्यभाग साधतात ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!