कविता :  रुंजी

कविता :  रुंजी

कविता - रुंजी
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
चाल - (या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे)

या फुलण्यावर अन् हसण्यावर
जीव खुळा जडला रे
जीव वेडावला रे
छंद मला जडला रे ll धृ ll

हसरे डोळे, खुणावती हे
मूक संमती देती
गो-या गो-या गालांवरती
नकळत गुलाब फुलती
हळव्या माझ्या मनात रुंजी
घालतील गं तारे ll १ ll

निळ्या नभात गूढ कुणीतरी
शीळ घालीत येई
इवल्या इवल्या पंखांवरती
रंगपंचमी झाली
इंद्रधनुचे सात रंगही
त्यात मिसळूनी गेले ll २ ll

शुभ्र सुंदर चांदणं लेवून
रात पुनवेची आली
चांद सखा हा घिरट्या घाली
सखीच्या अवती-भवती
प्रीतिसंगम दिव्य असा हा
मनास मोहवितो रे ll ३ ll

श्रावणधारा रिमझिम पाऊस
मनमोर फुलवी पिसारा
हिरव्या हिरव्या गर्द रानी,
टप टप पडती धारा
तृप्त झाली धरणी माता
स्वर्ग भूवरी उतरे ll ४ ll

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!