कविता – माया आभाळाची

कविता - माया आभाळाची

कविता - माया आभाळाची
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

निळ्या-निळ्या नभाखाली,
इवली-इवली रोपं उगवली
उन्हं झेलून अंगावरी,
सारी डोलती, बागडती...

थंडी, वादळी-पावसाने,
त्यांना नाहीच सोडले...
कले-कलेने तरीही ती,
रोपं वाढली-वाढली...

हां हां म्हणता दिसं गेले,
दर रोपट्याचे झाड झाले...
माया आभाळाची पुरती,
झाडं शीत सावली देती...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!