कविता : ‘ मातृभाषेचं ऋण ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
दिनांक : मंगळवार, २१ फेब्रुवारी २०२३
वेळ : २ वाजून २८ मि.
“मराठी असे आमुची मायबोली” अर्थात् आपली प्रिय मातृभाषा
या डिजिटल युगातही सतत वापर करुन नक्की हवी टिकवायला !
म्हणून युनेस्कोने १९९९ ला जागतिक मातृभाषा दिवस सुरु केला
हेतू एकच भाषिक-सांस्कृतिक-विविधता व जागरुकता जपायला !
जगभरात ७००० बोलीभाषा व भारतीय २२ मुख्य भाषा
एकट्या भारतातच आहेत सुमारे हजारच्यावर मातृभाषा!
मातृभाषा लोप पावत असल्याबद्दल सर्वत्र जागतिक चिंता
म्हणून जागतिक-मातृभाषा-दिन साजरा होण्याची महता !
२१ फेब्रुवारी १९५२ ला ढाका विद्यापीठात केला गोळीबार
मातृभाषेच्या अस्तित्वासाठी झुंझणारे विद्यार्थी झाले ठार !
जो हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ‘मातृभाषा-दिन’ केला युनेस्कोने !
तो ‘टंग डे, मदर लँग्वेज डे, मदर टंग डे, लँग्वेज मूव्हमेंट डे’ !
कुणी कितीही भाषा शिकल्या तरी तो मातृभाषेतच उत्तम व्यक्त होतो
गाढ झोपेतून अचानक जाग आल्यावर तो आधी मातृभाषेतच बोलतो !
इतर भाषांच्या तुलनेत मातृभाषेतच अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त होतो
हे कोणी मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञही ना नाकारु शकतो
मराठी भाषा ही आईसमान प्रिय म्हणून मराठी भाषेचा सार्थ अभिमान
मुलांच्या सर्वांगीण विकासास मुख्यत्वे आवश्यक मातृभाषा-अभियान !
प्रत्येकाच्या आयुष्यात मातृभाषेचं अनन्यसाधारण असं महत्वाचं स्थान
आपापली मातृभाषा हीच आपली खरी ओळख करू शकते निर्माण !
मराठी भाषेचं सामर्थ्य व सौंदर्य दिसून यायला, कारणीभूत यांची लेखणी
ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई, चोखामेळा आदि मान्यवर मंडळी
तसेच स्वा.सावरकर, कुसुमाग्रज, भा. रा. तांबे, पुलं देशपांडे, बहीणाबाई
प्र के अत्रे, वसंत कानेटकर, वसंत सबनीसादि मान्यवर नाटककार मंडळी
या सर्वांच्या योगदानामुळे अधिक समृद्ध झाली आपली मातृभाषा
देव-भाषा-संस्कृतवर आधारित, सम्पन्न अशी मायबोली मराठी भाषा
आपणाला तसेच आपल्या वाणीला सामर्थ्य व संजीवनी देणारी भाषा
तिच्याच माध्यमातून सदा व्यक्त होण्यासारखी अन्य काही नसे संपदा !
आपली संस्कृती इतकी महान्, मातृभाषेला मातेएवढंच उच्च स्थान !
जन्मदात्या आईच्या संस्कारांनी जगात टिकून, सोडू शकू आपली छाप
मातृभाषेनं हातभार लावून सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा केला पूर्ण विकास
आईचं व मातृभाषेचं ऋण फेडायला पुन्हाएकदा जन्मावं लागेल खास !
आईचं व मातृभाषेचं ऋण फेडायला पुन्हाएकदा जन्मावं लागेल खास !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply