कविता –   मना-मनामध्ये गोडवा

कविता -   मना-मनामध्ये गोडवा

कविता -  मना-मनामध्ये गोडवा
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

जरी प्राचीन अशी आमुची परंपरा,
गूढ मतितार्थ दडलेला यातच खरा...

विजय-पताका ही हिंदू संस्कृतीची...
म्हणूनी उभ्या होती गुढी, दारोदारी...

आजही विजयाची हीच निशाणी
स्वाभिमानाची गुढी उंचावू गगनी...

अन्याय होईल विविध स्वरूपात...
झुगारून देऊ, एकाच झटक्यात...

गुढी-पाडव्याचा एकमेव कान-मंत्र...
आज तनाने-मनाने होऊया स्वतंत्र...

लढण्याचा आमुचा कणखर बाणा,
निडरपणाने साजरा करू या सणा...

श्रीखंड-भोजनी, असो किंवा नसो,
मना-मनामध्ये, गोडवा कायम वसो...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!