कविता – भावगीत 🌷 ‘ भ्रम आणि सत्य-स्थिती ‘ तारिख – शनिवार, १० फेब्रुवारी २०२४

कविता -🌷 ‘ भ्रम आणि वस्तुस्थिती ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, १० फेब्रुवारी २०२४
वेळ – दुपारी ४ वाजून २८ मि.

खूपदा माणसाच्या डोक्यात वेगळी हवा शिरते, …
वाटते, “पान हलत नाही आपल्यावीण कुणाचे”…

प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती फारच निराळी असते …
भ्रामक-कल्पनांच्या विश्वात-भ्रष्ट मति गुंग असते …

कुणीही आहे म्हणून किंवा कुणी नाही म्हणूनही,
विश्वातील कोणाचं, कधीही काहीच अडत नाही …

चंद्र-सूर्य-वृक्ष-वेली-फुलं-पानं-सृष्टीचे ऋतु-चक्र …
चोखपणे पाळती निसर्गाने आखलेले वेळापत्रक !

अडत नाही आई-विना, पोरा-बाळांचं सुध्दा काही …
प्रेमळ कुणी नंद-यशोदा अत्यंत मायेने सांभाळती …

पत्नी नाही म्हणून विधुराचंही कांहीच नाही अडत …
शुभ-कार्यी कनवटीला सुपारी लावून काम भागतं …

पति‌वीण विधवा स्त्रीचंही तसं फारसं अडत नाही …
ओटीत श्रीफळ ठेऊन साधू शकते ती कार्यसिद्धी …

असे असूनही, वात्सल्य-प्रेमभावच प्रभावी ठरतात …
एक-एकटे पति-पत्नी, कर्तव्य निभावंतंच जगतात …

पत्नीच्या पश्चात मुलांचे आई-व-बाप दोन्ही होतात …
आईची उणीव लेकरांना, अजिबात भासू न देतात …

पति नाही म्हणून, स्त्रिया पेलतात संपूर्ण जबाबदारी …
नोकरी-व्यवसाय सांभाळूनच मुलांवर सुसंस्कार करी …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆








































































































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!