कविता – भक्तिगीत 🌷 ‘ पुण्य-योग ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, १० फेब्रुवारी २०२४
वेळ – दुपारी ४ वाजून २८ मि.
श्री तिरुपती-बालाजींच्या-दर्शनाचा योग,
जेव्हा येतो जुळून, तोच खरा पुण्य-योग …
जस-जसे पुण्य गाठीशी जमा होत जाते,
तस-तशा सर्व गोष्टी जमून येणे सुरु होते …
तत्पूर्वी मनात वाटते एक अनामिक हुरहूर …
भगवंताच्या भेटीची आसही लागते पूरेपूर …
घरातील नास्तिक व्यक्तीस जणू देऊन हूल …
तीर्थक्षेत्र-यात्रा-सहलीची, अंधुकशी चाहूल !
नाही नाही म्हणता-जाण्याचे वेध लागतात …
सामानाची बांधाबांध-चर्चासत्र-सुरु होतात …
नास्तिक-व्यक्तिचा विरोधं थोडा कमी होतो …
इतकंच नव्हे, तो यात्रेच्या तयारीला लागतो !
कल्पनातीत-अशक्यप्राय गोष्टी, जमून-येतात …
बहुधा याला, ईश्वर-भेटीचं-आमंत्रण-म्हणतात …
एकूणच उत्साह नुसता ओसंडून वाहू लागतो …
कदाचित् भेटीचा हाच ईश्वरीय-संकेत असतो !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply