कविता : 🌷 " बेधुंद मनाची सरिता "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
बरसून मोकळा झाला, तो मेघ सांवळा-सांवळा...
अन् तलखीचा दाह तडक कुठच्या कुठं पळाला...
बघता-बघता जादू-सम सुरू-विजांचा-लखलखाट...
अंगात-चेव-आल्यासारखा, वा-याचाही सुळसुळाट...
सुखद जल-धारांच्या वर्षावाने, संतुष्ट सृष्टी भरारा...
आनंदाच्या चाहूलीने तो सैराट झाला वादळ-वारा...
अनवट झुळूक येऊन, कुंतल भुरुभुरू उडू लागले...
तृप्तीने डोळे मिटता, लबाड आकाशही झाकोळले...
मंद-मंदसा गंध पसरला, सुगंधित ओल्या मातीचा...
हुंगता कळत नकळतच वाहे, बेधुंद मनाची सरिता...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply