कविता – बालगीत 🌷 ‘ हूप हूप हूप ‘. तारिख – शुक्रवार, ५ जानेवारी २०२४

कविता – बालगीत 🌷 ‘ हूप हूप हूप ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शुक्रवार, ५ जानेवारी २०२४
वेळ – दुपारी १ वाजून ३ मि.

माकडा माकडा, हूप हूप हूप
तुझ्या शेंडीला, शेरभर तूप

हूप हूप हूप, शेरभर तूप 
मस्ती करूया खूप खूप खूप

फांदी-फांदीवर, झाडा-झाडांवर
बिनधास्त उड्या, मारतोस तू

आंबा, पेरू, केळ्यांवर-
चांगलाच ताव, मारतोस तू

माणसां सारखा, चालतोस तू …
नक्कल करण्यात‌ तरबेज तू

सर-सर झाडांवर चढतोस तू …
गोलांट्या उड्या मारतोस तू …

श्री हनुमानाचा, वंशज तू …
बुध्दिमान अन् चतुर तू …

माकडचेष्टा करतोस तू …
आम्हां खूप खूप हसवतोस तू

माकडा माकडा, हूप हूप हूप …
तुझ्या शेंडीला, शेरभर तूप …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!