कविता – बालगीत 🌷 ‘ हुश्शार पोपट ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३
वेळ – सकाळी १० वाजून १९ मि.
विठु-विठु आवाज, करतो कोण ?
पोपटी हिरवागार, आहे कोण ?
हिरव्या झाडीत, लपतो कोण ?
फांदीवरुन झोके, घेतो कोण ?
लालबुंद चोचीने खातो कोण ?
आंबे, पेरूंना, चोचवतो कोण ?
हुबेहूब नक्कल, करतो कोण ?
अर्जुन बरोबर भात, खातो कोण ?
असा हुश्शार पोपट, आहे कोण ?
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply