कविता – बालगीत 🌷 ‘ रंगीत-झंगीत ‘ तारिख – रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता – बालगीत 🌷 ‘ रंगीत-झंगीत ‘

कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – रविवार, २१ जानेवारी २०२४
वेळ – दुपारी १ वाजून ५३ मि.

सुंदर, कोमल, रंगीत-झंगीत …
फुला-फुलांवरुन, पाकळीत …

कोण हळूच डोकावून जाते …
बघत बसता नजरच खिळते …

मोहक इतके की वाटे पकडावे,
लबाड इतके की हाती न यावे …

भान हरपून पाठीमागे लागावे,
तर गुंगारा देऊन निसटून जाते …

रंगीबेरंगी जादू अशी करणारे …
नाजुक-चंचल, खुश करणारे …

फुलांशी खेळते ते फुलपाखरू …
अर्जुनला वाटते, कसे बरं धरू ?

पकडा-पकडी जोशात चालते …
आजीची मस्त करमणूक होते …
बागेत सगळीकडे भिरभिरते …
बाळ-गोपाळांना ते फार आवडते …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

























Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!