कविता – बालगीत 🌷 ‘ मुंगीताई ‘ तारिख – मंगळवार, २३ जानेवारी २०२४

कविता – बालगीत 🌷 ‘ मुंगीताई ‘

कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – मंगळवार, २३ जानेवारी २०२४
वेळ – ४ वाजून २२ मि.

मुंगीताई मुंगीताई, लगबग कशापायी ?
सांगा ही, सदाचीच कसली इतकी घाई ?

वाघ पाठीशी जणू, लागल्या सारख्या …
का हो तुम्ही धावता, वेड्या-सारख्या ?

कडक शिस्तिचंही, तुम्ही पालन करता …
नीट रांगा करुन, मग धावतच राहता …

आकाराने तुम्ही ताई, इटुकल्या कित्ती …
रात्रंदिवसाची करता पण धावपळ अति …

कुणाचीच तुम्हांला वाटत नाही का भिती …
सततच्या चालतात हो तुमच्या करामती …

कधी-कधी कुणाशी, पंगाही तुम्ही घेता …
सुमडीत कुठे-कुठे, जाऊन तुम्ही डसता …

मुंगीताई तुम्ही जरी एवढ्याश्शा दिसता,
करु शकता हत्ती-दादालाही, वेडापिसा …!

थकणं तर तुमच्या, स्वभावातच नाही …
येते कुठून ही ऊर्जा, सांगा आम्हालाही …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
















































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!