कविता – बालगीत 🌷 ‘ बागुलबुवा ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – बुधवार, १९ जानेवारी २०२४
वेळ – दुपारी १२ वाजून ४० मि.
बागुलबुवा बागुलबुवा,
तुम्ही असं का करता ?
आम्हां छोट्या मुलांना,
असे, का हो घाबरवता ?
रोज खेळता-भांडताना,
तुम्ही हजेरी का हो लावता
एकजात सगळ्यांना,
घाबरुन-गुट्ट का करता ?
तुमचं नाव ऐकल्यावर,
एकदम चिडी-चूप होते …
दंगा मस्ती बंद होऊन,
चक्क घाबरगुंडी उडते …
अधुन-मधून कधीतरीच,
याल तर एकवेळ चालेल …
रोज रोजची कडक शिस्त,
मग घरा-घरातील थांबेल …
फ्रेंडशिप-डेला आलात तर,
मस्त गट्टी, आपली होईल …
तुमच्या नावाची भिती मग,
कापरासारखी उडून जाईल …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply