कविता – बालगीत 🌷 ‘ छकुला ‘. तारिख – शनिवार, ६ जानेवारी २०२४

कविता – बालगीत 🌷 ‘ छकुला ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, ६ जानेवारी २०२४
वेळ – रात्री ९ वाजून १५ मि.

इवलिशी पावले अन् इवलेसे हात,
टप्पोरे मस्त डोळे, लकलकतात …

दुडूदुडू चाले, पेंग्विन जसा …
गोब-या गालांचा आमचा ससा …

गोड गोड हसून, आपलंसं करी …
देवघरात जाऊन, नमो-नमो करी …

मधाळ आवाजात तो गाणी गातो …
हात उंचावून “उचलून घे” म्हणतो …

पुस्तकं उघडून, पानं चाळवतो …
चित्रातल्या प्राण्यांशी गप्पा मारतो …

एका पायावर भुर्र जायला तयार …
गाडीत बसून, टुकुर-टुकुर बघणार …

मस्ती करतो अन् “ओ नो” म्हणतो …
मिश्कीलपणाने नाक उडवून हसतो …

अस्सा गोड आमचा, अर्जुन छकुला …
त्याच्याशी खेळताना, वेळही थांबला …!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆










































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!