कविता : बालगीत 🌷’ चीव-चीव ‘ तारीख : २० मार्च २०२३

कविता : बालगीत 🌷’ चीव-चीव ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारीख : २० मार्च २०२३
वेळ : १२ वाजून ३४ मि.
चिमणा-चिमणा असूनही जीव,
सतत करतात, चीव-चीव-चीव …
चोचीत पकडून काडी-न्-काडी,
ऊबदारसं घरटं, बनवून सोडी …
नवजात पिल्लं घरट्यात राहून,
वाट बघती त्यांची, ‘आ’ वासून !
चिऊताईच्या इवल्याशा जीवनात,
विवंचनेला थाराच नसतो, कामात …
रात्रंदिवस कष्ट उपसती आनंदानं …
पण नाहीच माहीत, त्यांना थकणं …
चोची मधून आणतात दाणा-पाणी,
पिल्लांना भरवतात चिमणा-चिमणी …
आयुष्य मोठं असो वा असो लहान,
प्रत्येक क्षण-न्-क्षण आहे मौल्यवान
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!