कविता – बालगीत 🌷 ‘ गट्टी ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – सोमवार, १ जानेवारी २०२४
वेळ – दुपारी ३ वाजून ०२ मि.
हत्ती दादा हत्ती दादा,
तुम्ही फार आवडता …
बाप्पा मोरया सारखे,
तुम्ही खरंच दिसता …!
हिरवं गवत, झाडपाला,
तुम्हाला हवा, खायला …
सोंडेत भरून पाणी,
होळी सुध्दा खेळता …!
सह-कुटुंब, सह-परिवार
कळपाने तुम्ही फिरता …
लहान-मोठ्या सर्वांवर …
खूप खूप रोब झाडता …
असह्य तलखीत तुम्ही,
पाण्यात डुंबत बसता …
कळपातील हत्तीं-बरोबर,
धम्माल मस्ती करता …!
तुम्ही महा-शक्तिशाली …
अफाट तुमची बुद्धिमत्ता …
प्रसंग पाहून तुम्ही,
डोक्यानेच कामं करता …
चेंडू जवळ आला तुमच्या,
त्याला, लांबवर फेकता !
कोणताही असो खेळ तुम्ही,
पटकन् खेळात रमता …
अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीत,
हमखास हजेरी लावता …
छोट्यांबरोबर गट्टी तुमची,
त्यांना तुम्हीच, आवडता …!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply