कविता – बालगीत 🌷 ‘ गंमत-जम्मत ‘ तारिख – बुधवार, २७ डिसेंबर २०२३

कविता – बालगीत 🌷 ‘ गंमत-जम्मत ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – बुधवार, २७ डिसेंबर २०२३
वेळ – दुपारी १ वाजून २ मि.

च्याऊ म्यांऊ, च्याऊ म्यांऊ 
पख्खालीचे पाणी प्याऊ …

च्याऊ म्यांऊ, च्याऊ म्यांऊ 
पख्खालीचे पाणी प्याऊ …

एकदा किनई, एक असते मनी-माऊ …
गोरी गोरी छान, अन् मऊ मऊ मऊ …

डोळे मिटून म्हणे ती, म्याऊं-म्याऊं …
भूक लागली की ती, शोधायची खाऊ …

बंद दरवाज्यावर करायची, खुर्-खुर्-खुर्
नाही तर मग सुरू व्हायची, कुर-कुर-कुर

मनीमाऊच्या गडबडीने, आजी पण उठली …
” थांब गं मने थोडी,” मनीला ती म्हणाली …

मग लगेच, आजीने दूध तापायला ठेवलं …
थोडं चहाला ठेवलं, थोडं विरजण लावलं …

थोडं कॉफीला ठेवलं, थोडं खीरीला ठेवलं …
थोडं नैवेद्याला ठेवलं, थोडं घर म्हणून ठेवलं …

थोडं पूजेला ठेवलं, थोडं बाळ-गोपाळांना दिलं …
मग थोडं अर्जुनला दिलं, थोडं मनी-माऊला दिलं …

इतका वेळ वाट बघत, गुपचुप बसली होती मनी …
बशीभर दूध पाहून, तिच्या तोंडाला सुटलं पाणी …

आजीने “पी” म्हणेतो, मनी बघत होती एकटक …
लाल-चुटुक जिभलीने मग, मनीनं दूध केलं मटंक …

चुटू-चुटू आवाज करीत, सारं दूध केलं तिनं फस्तं …
मनीची करामत बघून, अर्जुनला वाटली खूप गंमत …

अश्शी गोष्ट आहे मनी-माऊची, गंमत-जम्मत …
अश्शी गोष्ट आहे मनी-माऊची, गंमत-जम्मत …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆







































































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!