कविता – बालगीत 🌷 ‘ ओळखा पाहू ‘. तारिख – रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता – बालगीत 🌷 ‘ ओळखा पाहू ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – रविवार, २१ जानेवारी २०२४
वेळ – दुपारी १ वाजून ५३ मि.

बगिच्यात, आभाळात उधळतात सप्त रंग …
बघता क्षणीच पकडायला सगळे होती दंग

फुला-फुलांचे रंग लेवून मनमोहक दिसतात …
लहान मोठ्या सगळ्यांनाच सतत लुभावतात 

आवाज न करताच ते गुपचुप येऊन बसतात …
मध शोषून झाला की सुमडीत पसार होतात 

एवढे लहानसे असूनही सर्वांना वेड लावतात
वेड्यासारखे सारे त्यांच्या पाठीमागे धावतात …

किती पाठलाग केला तरी नक्की बगल देतात …
हातावर तुरी देऊन ते बघता-बघता सटकतात

ओळखा पाहू कोण आहेत, जे असं करतात ?
आकर्षक सुंदर मोहक दिसून सदा मोहवतात …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆





































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!