कविता – बालगीत 🌷 ” इळी मिळी गुपचिळी “

कविता - बालगीत 🌷 " इळी मिळी गुपचिळी "

कविता - बालगीत 🌷 " इळी मिळी गुपचिळी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

इवली इवली चिऊताई ...
केव्हढी तिची घाई-घाई ...

चोची मधून दाणे न्हेई,
पिल्लांना ते चोचीत देई ...

इवला असून तिचा जीव,
कसलीच नाही टिव-टीव ...

काडी-न् काडी जमवते ...
अन् ऊबदार घरटं बांधते ...

थंडी-पाऊस जुमानत नाही ...
चिवचिव कधी थांबत नाही ...

क्षणभराची उसंत नाही ...
दमणं तिला माहीतंच नाही ...

हिरवे वाटाणे सोलताना,
अळी दिसली वळवळताना !

हिरवी-हिरवी, होती अळी ...
चोचीत उचलून भुर्र पळाली ...

पिल्लांकडे, चिऊताई गेली ...
चिऊची पिल्लं खूष झाली ...

यावर अर्जुन अन् आजीची ...
" इळी मिळी गुपचिळी " ...

अर्जुन आणि आजीची ...
" इळी मिळी गुपचिळी "...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!