
कविता - 🌷 " नैय्या करी पार ..."
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
मनं हा केवडा ...
भाव हा भाबडा ...
पुनरपि " विषयी " ...
रमणे नाही ......
वाहुनी चंपक ...
भाव हा सम्यकं ...
पुन्हा इहलोकी ...
येणे नाही ......
मन हे बकुळ ...
भाव हा प्रेमळ ...
पुनरपि " फिरुनी "
येणे नाही ......
मन हे सायली ...
चरणी वाहिली ...
कृपेची साऊली ...
द्यावी आता ......
मन हे कर्दळ ...
भाव तो सोज्वळ ...
पुनः पुनः जन्मा ...
येणे नाही ...
मन हे तगर ...
आनंद-सागर ...
नैय्या करी पार ...
झणी आता ......
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply