कविता : 🌷 " नियती "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
कधी-कधी समाजांत असंच काहीसं चित्र, पाहण्यात येतं
एखाद-वेळी सुख अगदी दारात येऊन उभं ठाकलं असतं
एकीकडे कुटुंबात होते एका नव्या व्यक्तीची हर्षदायी भर,
तर त्याचवेळी कुटुंबाच्या आधार-स्तंभाची अंतिम घर-घर
सुखाच्या सुंदर भावनांनी एका डोळ्यात मावत नाही हसू,
तर दुसऱ्या डोळ्यामधून घायाळ होऊन, पाझरतात आसू !
बहुतांशी जन्म-जन्मांतरीचं पूर्व-संचित म्हणजेच 'नियती'
त्या पूर्व-संचिताच्या कडू-गोड फल-स्वरुपाची ती प्रचिती !
भगवद्गीतेत म्हणून परोपरीने सांगितलंय, देह-आहे-नश्वर
निराकार-निर्गुण-आत्म-स्वरुपी तो ईश्वर मात्र आहे अमर !
काम-क्रोधादि षड्रिपुंचे भोग बंधनकारक फक्त जड-देहाला,
पण कोणतंच बंधन नाही अदृष्य-शक्तिमान आत्म-तत्वाला !
सुख-दु:खाच्या पलीकडे जाऊन मन-बुध्दी केली जर तटस्थ,
तर कोणताही कडू-गोड प्रसंग, करु शकणार नाही अस्वस्थ!
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply