कविता - तरी अजूनही
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
बघता बघता आता पाच गेले अन् पन्नास राहिले
तरी अजूनही
मनातून-कणाकणातून, तारुण्य सळसळते आहे
गाफील असता कित्येक वेळा वीजा कोसळल्या
तरी अजूनही
'मोडेन पण वाकणार नाही' हा बाणा कायम आहे
जीवाभावाची "आपली" अशी माणसं सोडून गेली
तरी अजूनही
जीवनामधील रस आणि आनंदात कमतरता नाही
"माझं-माझं"म्हणत बरंचसं गोळा केलं-कवटाळलं
तरी अजूनही
परमेश्वर-आराधनेला पर्याय नाही हेही जाणून आहे
अचानक कितीही बांका प्रसंग समोर उभा ठाकला
तरी अजूनही
या-ना-त्या-रूपे देवच येतो, दहा हत्तींचं बळ द्यायला
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply