कविता :🌷 ” चिरंतन “

कविता - " चिरंतन "

कविता - 🌷 " चिरंतन "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

ती रुपेरी रजनी अजुनही नाहींच सरली,
दिसाची तमा तर तिने कधीही नाही केली...

मनातील आभाळ-माया, दाटली-दाटली...
घनतमी रात्र नजरेमध्ये, साठली-गोठली...

त्या पहिल्या कोवळ्या-प्रेमाची ती निळाई...
रुळत असे केसांची अलवार बट ती भाळी...

वाटे भुरळ घालणारे विहंगम-दृश्य गोठवावे,
उंच भरारी घेणा-या मनास का बरे थोपवावे ?

आयुष्यातले चढ-उतार, येतात-अन्-जातात...
पण जातानाही ते बरंच कांहीं देऊन जातात...

हळुवार अनुभूती देऊन गेलेले ते हळवे क्षण...
मनोमनी जीवापाड जपायला हवेत ते चिरंतन...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!