कविता :🌷 घन-तमी

कविता - घन-तमी

कविता : घन-तमी
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

दाटून आली रात्र घन-तमी,
सर्वत्र अगम्य-गहन भासते...
निर्मम, नि:शब्द असूनही,
मूकपणे एकमेकां उमगते...

झुळुझुळू संतत पाणी वाहे,
टिपूर चांदणे गाई गगनी...
पिल्लांची कुजबुज कानी,
अन् लाजते मनी फुलराणी...

जल-लहरींचा सुखद निनाद,
ताला-सुरातील वेणूमय नाद...
राधेच्या मनात, चलबिचल
झाडांची अवचित सळसळ...

झुळूक हळूच वा-याची येता,
मोगरा दरवळत आला आला...
लुकलुक चांदवा बघता बघता,
मनातील पारवा घुमू लागला...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!