कविता-गझल 🌷 ‘ सुखाचे हळवेे क्षण ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – बुधवार, २० मार्च २०२४
वेळ – दुपारी, २ वाजून ३२ मि.
तारुण्य सळसळते, डोळे अधीर ओले …
मन लाजाळुचे पान, अलगद मिटून गेले …
ओझरतेसे स्पर्श, लज्जेची लाली पसरे …
सांज रंग अवतरताना, अंग-अंग मोहरे …
सुखाचे आजपावेतो, मनोरे रचून झाले …
साखर झोपेतले रम्य, स्वप्नही भंगून गेले …
रात्र नाहीच सरली, पण स्वप्न विरुन गेले …
सुखाचे ते हळवेे क्षण, वेचायचे राहून गेले …
सुखाचे ते हळवेे क्षण, वेचायचे राहून गेले …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply