कविता : 🌷 " कालातीत-ज्ञान "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
१७ व्या शतकात, श्रीसमर्थांनी दासबोध-ग्रंथ लिहीला ...
शिवथर-घळीला निबीड वनामध्ये, माघ शुद्ध नवमीला ...
मानवी-जीवनाविषयी त्यांचा परिपूर्ण सखोल-अभ्यास,
ज्ञानी-सशक्त-समाज घडविणे-हाच होता एकमेव ध्यास ...
रामदास स्वामींनी केली भक्तिमार्गाने-शक्तिची उपासना
त्यांचा ठाम विश्वास, उपासनेतूनच सामर्थ्याची जोपासना ...
आजही कालातीत अशी 'समर्थ-शिकवण', तंतोतंत लागू ...
उमगते वैयक्तिक-सामाजिक-प्रश्नांवर कसा ठेवावा काबू ...
या ग्रंथात नानाविध गोष्टींचा समावेश व मुद्देसूद उहापोह ...
स्वास्थ्य-पूर्णतेस जरुरी-नष्ट-करणे, काम-क्रोध-लोभ-मोह ...
मोजक्याच-शब्दात व्यक्त केला सडेतोड-अचूक युक्तिवाद ...
ना शब्दांचं अवडंबर, ना-वितंडवाद, त्यात-निव्वळ-बुद्धिवाद ...
आरोग्याचा कानमंत्र लहान-थोर, स्त्री-पुरुष, सर्व सुजाण ...
मानवी मनास, ज्ञानेंद्रियांना उपयुक्त-हे उपदेशपर लिखाण ...
सांगड घालते, ज्ञान-परमार्थ धर्मनिष्ठा-देशप्रेम-भक्तिमार्ग,
मानसिक आरोग्य-शरीर स्वास्थ्याचा, हा एकमेव राजमार्ग ...
ज्ञानाचा-प्रसार, मनावर ताबा, नेटक्या संसाराचं मार्गदर्शन ...
आयुष्यास सुंदर व योग्य वळण कसे लावावे, याचं विवरण ...
शरीर-स्वास्थ्य-दैनंदिन जीवनातील नानाविध पैलूंना स्पर्श,
तत्कालीन बहुतांश अध्यात्मिक-वाङमयाचा, जणू सारांश ...
हा अनमोल ग्रंथराज नाही नुसता वाचण्या-पारायणासाठी,
जरुरीचं आहे शब्दांचं चिंतन-मनन, प्रत्यक्ष आचरणासाठी ...
सतराव्या शतकातील हा ग्रंथराज आजही आहे मौल्यवान,
देई कालातीत-ज्ञान जणू काही अचूक-अमोघ-रामाचा-बाण
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply