
कविता - कधीतरी
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
कधीतरी उगा मन हळवं होतं...
कारण असो-नसो, गढूळ होतं...
रमत नाही वेडं कश्या-कश्यात...
झोंबाझोंबी करी मनातल्या मनात...
अश्रूंनी आभाळ भरुन आलं,
कडू-गोड स्मृतींच्या सावलीनं...
काळ्या घनांना ही परतविलं...
मन बावरुन हळहळत राहिलं..!
आठवणींना शेवटी पावसात,
सोपविलं चिंब भिजण्यास...
नुसतंच बरसत राहणं तेवढं,
आता फक्त उरलंयं हातात ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply