कविता :🌷 ” आबादानी “

कविता - " आबादानी "

कविता : 🌷 ' आबादानी '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

पहिला-वहिला पाऊस...
धरणी माय झाली खूष...
जणू काही आला धावत,
भिजविण्या सृष्टीची कूस...

आभाळ-माया खुणावते...
जणू वीजेसमान चमकते
पाखरे प्रत्येक-घरट्यातली
पिल्लांना-पंखांखाली-घेती...

अंबर कोसळे धडाडधूम...
वीज दणाणते, कडाडून...
ओहोळ सुटले बांधांवरुन...
ओघळू लागले खळाळून...

हंबरत निघाली गुरं-ढोरं...
धाव घेतील गोठ्याकडं...
भिजून गेली सारी शिवारं...
मस्तीत नाचतील पोरं-टोरं...

विश्वासानं भरेल श्वासा,
कष्टणारा शेतकरी राजा...
ही कृपा पर्जन्य-राजाची,
आबादानी पूर्ण आसमंती...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!