कविता - अभंग 🌷 " सूक्ष्म-रूप चिरंतन "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ८ सप्टेंबर २०१६
जरी खळगी भरण्या, पोटाची
कुंभार नित्यच मातीला तुडवी ...
परि खुणगाठ बांधी तो मनाशी,
मिसळणे मातीतच एके दिवशी ...
यथार्थ असेच हे, सत्य-वर्णन ...
पंचप्राण होती सम्पूर्ण विलीन ...
त्रिकालाबाधित असे हे कथन ...
मृत्युपश्चात जड-देह होईं दहन ...
परि सूक्ष्म-रूप ते, राही चिरंतन ...
त्यास लागू नाही जन्म वा मरण ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले🙏🕉️🔆
Leave a Reply