कविता - अभंग 🌷 " सुमिरन "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, ६ एप्रिल २०२४
मनुष्य देह म्हणजे एक यंत्र ...
श्वास-उछ्श्वासाचे चाले तंत्र ...
राजाधिराज असे आत्माराम ...
त्याचा राखावा सदैव सन्मान ...
आत्मारामाचा हा कान-मंत्र ...
सत्कारणी लावणे जीवनसूत्र ...
चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून,
लाभे फक्त एकदा मानवी-जन्म ...
सर्वस्वी आपल्याच हाती आहे,
निज-जन्म सार्थकी लावण्याचे ...
स्वतः प्रयत्नांची शर्थ करूनच ...
सदाचार अन् सत्कर्म अगणित ...
सुमिरन करुया जनहो सत्-नाम ...
अंती जाणे आहे सर्वां निज-धाम ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply